सुनेत्रा पवार राज्यसभेवर शिक्का मोर्तब ; बारामतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष
बारामती : लोकसभेच्या पराभवानंतर सुनेत्रा पवारांची आज विधानसभेत राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यसभेवर त्यांचा शिक्का मोर्तब होताच, बारामतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला.
विधानभवनात सुनेत्रा पवारांनी अर्ज दाखल केला. दरम्यान यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. शिवाय सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळही उपस्थित होते. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी छगन भुजबळ, प्रफुल पटेलही इच्छुक होते अशीही चर्चा होती, मात्र उमेदवारीची बाजी सुनेत्रा पवार यांनीच मारली.
या निवडीनंतर बारामती शहरात आणि काटेवाडीत फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत एकमेकांना पेढे भरवित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
