October 24, 2025

विश्वास कोणावर ठेवता येत नाही, म्हणूनच राज्यसभेची उमेदवारी घरात ….आमदार रोहित पवार.

rohit pavar

बारामती : दादांच्या पक्षात अस्वस्थता आहे ती अजित दादांना माहित आहे. ती अस्वस्थता असल्याने कोणावरच विश्वास ठेवता येणार नाही,  त्यामुळेच अजित दादांनी’ घरातील व्यक्तीला राज्यसभेची उमेदवारी दिली असल्याचे मत प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

आ. रोहित पवार पुढे म्हणाले की, अजित दादांसोबत गेलेल्या बहुतांश नेत्याची इडी नाहीतर सीबीआयची चौकशी चालू होती,  तसेच विकास निधीसाठी, सत्तेसाठी ते लोकं गेली आहेत, त्यामुळे साहेबांपासून फारकत घेतेलेल्या नेत्यांच्याकडे एकच कारण होत,  ते म्हणजे स्वार्थ  आणि स्वार्थ असलेल्या नेत्यांचे जर का समाधान नाही झाले तर ते भाजपा सोबत सुद्धा जातील हे सांगता येत नाही. त्यामुळे अजित दादांनी घेतलेला निर्णय राजकीय दृष्टीकोनातून योग्य असू शकतो. जर जवळचा मुलगा किंवा पत्नी असेल तर ते आपल्याला सोडून जाणार नाही बाकीच्या नेत्यांचा काही भरोसा नाही, माझे तर स्पष्ट मत आहे की त्यांच्याकडचे आमदार आणि खासदार जास्त काळ राहतील याची शाश्वती देता येत नाही.

विकास कामाबाबत भाजपाने पेपर वर्क करण्याच्या पलीकडे काहीच कामे केली नाहीत फक्त गंडवा गंडवी केली आहे त्यामुळे झालेल्या निवडणुकीत जनतेने भाजपाला नाकारले आहे. येत्या काळात महायुती किती काळ टिकेल हे सांगता येत नाही त्यामुळे येत्या पंधरा वीस दिवसात महायुती टिकेल असं वाटत नाही असेही पवार यांनी व्यक्त केले.

You may have missed

error: Content is protected !!