October 24, 2025

राम कृष्ण हरी…….बारामतीत वाजली तुतारी,…सुळे यांनी विजयाचा मारला चौकार

IMG-20240604-WA0154

सुप्रिया सुळे यांना बारामतीचा गड राखण्यात यश

बारामती : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे या जवळजवळ विजयी झाल्या असुन बारामतीकर शरद पवार यांच्याच पाठीशी असल्याचे दाखवून दिले आहे. एकूणच पवार विरोधी पवार या लढतीत अजित पवारांना मोठा धक्का बसला असून सुप्रिया सुळे यांनी विजयाचा चौकार मारला असुन भाजपच्या मिशन बारामतीला अपयश आल्याचे सिद्ध झाले.

राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर बारामतीतील लोकसभा निवडणूक ही पवार विरोधी पवार ही इतिहासातील पहिलीच निवडणूक आहे.  त्यामुळे  बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. या मतदार संघात कोणाचे वर्चस्व कोणत्या पवारांचे काकांचे का पुतण्याचे अखेरीस सुप्रिया सुळे यांना बारामतीचा गड राखण्यात यश आले असून सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत.

सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर बारामती लोकसभा मतदार संघातून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना लीड मिळाली. तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या पिछाडीवर राहिल्या आहेत इतिहासात प्रथमच पवार विरूद्ध पवार असा सामना बारामती लोकसभा मतदारसंघात झाला. सतराव्या फेरी अखेर सुप्रिया सुळे या 1 लाख 8 हजार 490 मतांनी आघाडीवर आहेत. सुप्रिया सुळे यांना 5 लाख 59 हजार 645 मते मिळाली असुन सुनेत्रा पवार यांना 4 लाख 50 हजार 582 मते मिळाली आहेत यावरून एक सिद्ध झाले की बारामतीकर हे सुप्रिया सुळेच्या पाठीशी असून बारामती ही मोठ्या साहेबांचीच आहे असेच म्हणावे लागणार आहे.

शरद पवार गटाचा बारामतीत जल्लोष

सकाळ पासूनच सर्व निकालाचा कल बाकी होता सर्व फेऱ्याचा निकाल येणे बाकी असतानाच सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादीच्या बारामतीत येथील शरद पवार गटाकडून विजयाचा जल्लोष सुरु करण्यात आला. सुप्रिया सुळे यांच्या विजयाबाबत प्लेक्स लावून गुलालाची उधळन सुरु झाली आहे.

मलिदा गँगचा फटका

बारामतीत मलिदा गॅगचा फटका बसला असून या गँगला नेहमी विजयाचा आत्मविश्वास असल्याची सवय नडल्याचे पाहायला मिळाले तसेच अजित पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ग्राउंड लेवलला काम न करता पैशांची मस्ती मोठ्या प्रमाणात आहे तर वाटयाला दिलेले पैसे स्वतःच दाबल्याने मतदारांनी कधी नव्हे ते आयत्या वेळी मतदानातून दणका दिल्याचे पाहायला मिळाले. जरी नेते कार्यक्षम असले तरी त्यांच्या आसपास असलेल्या पदाधिकारी आणि स्थानिक नेते यांनीच दगा फटका केला अशी चर्चा दबक्या आवाजात बारामतीत सुरु आहे.

शरद पवारांवर टोकाची टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचारा दरम्यान जेष्ट नेते शरद पवार यांच्यावर टोकाची टीका केली, अनेक उनिधुनी उकरून काढली ती टीका मतदारांच्या पचनी पडली नाही त्याचा उलटा परिणाम झाला आणि मतदारांनी सुळे यांना पसंती दिली.

मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मताची मागणी

सुनेत्रा पवार यांचा प्रचार करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करा असे आवाहन करण्यात आले त्यामुळे यावेळी अजित पवारांचा विकासाचा फॅक्टर चालला नाही उलट पक्षी मोदिंवरील रोष मतदारांनी व्यक्त केला.

You may have missed

error: Content is protected !!