October 24, 2025

संत ‘निरंकारी’च्या रक्तदान शिबिरास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

IMG-20240603-WA0057
बारामती : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने बारामती शाखेच्या सत्संग भवनात येथे रक्तदान शिबिराचे करण्यात आले होते. या शिबिरात 129 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. प्रामुख्याने यामध्ये महिलांचाही सहभाग असल्याचे आयोजकांनी सांगितले.
शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळ सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांच्यासह आजूबाजूंच्या शाखांचे मुखी तसेच सेवादल अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान नंदकुमार झांबरे यांनी तत्कालीन सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या प्रेरित संदेशाची आठवण करून दिली की, ‘रक्त धामण्यांमध्ये वहावे, नाल्यामध्ये नको’ हाच प्रेरक संदेश जीवनात उतरवत निरंकारी भक्त लोककल्याणार्थ आपल्या सेवा प्रदान करत असल्याचे सांगितले. अशप्रकारे सत्संगच्या माध्यमातून उपस्थितांना रक्तदानाचे महत्व पटवून देत रक्तदान का करावं या विषयी मार्गदर्शन केले.
या शिबिरामध्ये बारामतीतील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित स्व. माणिकबाई चंदूलाल सराफ या रक्तपेढीने रक्त संकलन केले.
सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी बारामती शाखेचे मुखी आनंद महाडिक यांच्यासह संचालक शशिकांत सकट, बाळासाहेब जानकर, महिला संचालिका वर्षा चव्हाण तसेच सेवादल, सेवादल भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले. तर मंचसंचालन दादासो पवार यांनी केले.

You may have missed

error: Content is protected !!