चौदाव्या फेरीनंतर सुद्धा सुप्रिया सुळे आघाडीवर….. किती ते सविस्तर वाचा
बारामती : सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासुनच सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली आहे मधल्या काळात पुरंदरमधील काही फेऱ्याच्या कलांमध्ये सुनेत्रा पवार आघाडीवर होत्या मात्र झालेल्या मतमोजणीत चौदाव्या फेरीनंतर देखील सुप्रिया सुळे या 73 हजार 631 मतांनी आघाडीवर आहेत
राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर बारामतीतील लोकसभा निवडणूक ही पहिलीच निवडणूक आहे. इतिहासात प्रथमच पवार विरूद्ध पवार असा सामना बारामती लोकसभा मतदारसंघात पाहिला मिळाला आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.बारामती लोकसभा मतदार संघातून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना लीड मिळाली आसुन. तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या पिछाडीवर आहेत दरम्यान आज बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना चौदाव्या फेरीनंतर सुप्रिया सुळे या 73 हजार 631 मतांनी आघाडीवर आहेत.
शरदपवार गटाचा बारामतीत जल्लोष
अद्याप सर्व निकालाचा कल बाकी आहे सर्व फेऱ्याचा निकाल येणे बाकी असतंच राष्ट्रवादीच्या बारामतीत येथील शरद पवार गटाकडून विजयाचा जल्लोष सुरु करण्यात आला असून सुप्रिया सुळे यांच्या विजयाबाबत प्लेक्स लावून गुलालाची उधळन सुरु झाली आहे. एकूणच आत्ता पर्यंत झालेल्या फेऱ्यांचा विचार करता जवळ-जवळ सुळे यांचा विजय निश्चित असल्याचे बारामती कारांकडून व्यक्त केले जात आहे.
