पहिल्या अकरा फेऱ्यांमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर
बारामती : राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर बारामतीतील लोकसभा निवडणूक ही पहिलीच निवडणूक आहे. इतिहासात प्रथमच पवार विरूद्ध पवार असा सामना बारामती लोकसभा मतदारसंघात पाहिला मिळाला आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.
बारामती लोकसभा मतदार संघातून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना लीड मिळाली आसुन. तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या पिछाडीवर आहेत इतिहासात प्रथमच पवार विरूद्ध पवार असा सामना बारामती लोकसभा मतदारसंघात असुन. दरम्यान आज बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना आकराव्या फेरीनंतर सुप्रिया सुळे या 48 हजारांच्या मतांनी आघाडीवर आहेत.
झालेल्या फेऱ्यांच्या मतमोजणीमध्ये सुप्रिया सुळे यांना 325721 मते मिळाली असुन सुनेत्रा पवार यांना 277684 एवढी मते मिळाली आहेत. त्यामुळे एकूण 48 हजार 37 मतांनी सुप्रिया सुळे या आघाडीवर आहेत.
