दुष्कृत्य’ केलं मुलाने आणि गुन्हा दाखल… बाप-लेकावर…

बारामती : मुलाचे अवैध संबंध पाठीशी घातल्याने आणि मुलगी हलक्या जातीची असल्याने तिची जात काढून तिला धमकी देऊन मानहानी केल्या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात बाप-लेका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने दोन वर्षे शरीर संबंध ठेवून मुलाने फसवणूक केली तर तु हलक्या जातीची असल्याने तुझ्याशी लग्न केल्यावर समाजात आमची आब्रु जाईल, तु आमच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करू नको, तु येथून जा अन्यथा तुझ्यावर खोट्या केसेस टाकु, अश्या धमक्या खुद्द दुष्कृत्य केलेल्या बापानेच पिडीतेला दिली या कारणावरून आरोपी बाप – लेकावर बारामती शहर पोलिस ठाण्यात बलात्कार, विनयभंग आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड हे करीत आहेत.