बहीनीने भावाच्या घरी न राहता, तिच्या घरी गेलं पाहिजे…महादेव जानकर
बारामती : बहीनीने भावाच्या घरी जास्त दिवस राहिले नाही पाहिजे, आपल्या घरी गेलं पाहिजे, सुप्रिया सुळे चंगल्या आहेत, मात्र माझी त्यांना विनंती आहे. आपल्या घरी म्हणजेच त्यांनी त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न करावा, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
पुढे बोलताना जानकर म्हणाले की, कॉंग्रेसच्या काळात घरे, वाडे मोठी होत गेली, आणि गरीब हा गरीबच राहिला, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा नारा दिला मात्र गरिबी हटली नाही तर गरीबच हटला नाव शाहू फुले आंबेडकरांचे मात्र प्रस्थापित व्यवस्थेलाच मुठ माती देण्याचे काम यांनी केले, त्यामुळे कॉंग्रेसने फार सेक्युलर असण्याची भाषा आमच्या समोर करू नये, असे एका प्रश्नाला उत्तर देताना जानकर यांनी व्यक्त केले. तर मी इथे कोणावरही आरोप करण्यासाठी आलो नाही तर अजित पवार यांनी माझा प्रचार केला, आता मी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीत आलो आहे. तर मी परभणीमधुन उमेदवार आहे तिथली मतदान प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. तिथे मी शंभर टक्के निवडून येणार आहे आणि मी केंद्रात मंत्री होणार असल्याचा विश्वास बोलताना जाणकार यांनी व्यक्त केला.
