आईबद्दल बोलला तर करारा जबाव मिलेंगा….खा.सुप्रिया सुळे.
बारामती : आजवर तुम्ही माझ्यावर, माझ्या वडिलांवर बोलला इथपर्यंत ऐकून घेतलं मात्र तुम्ही माझी आई किंवा रोहितची आई यांच्याबाबत बोलला तर करारा जवाब देईन असा इशारा सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता इशारा दिला.
बारामतीत महाविकास आघाडीच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या या मेळाव्यास पवार कुटुंबीयांपैकी प्रतिभाकाकी पवार, शर्मिला पवार, सुनंदा पवार, शुभांगी पवार, आ. रोहित पवार, रेवती सुळे आधी पवार कुटुंबीय तसेच मोठ्या संखेने महिला उपस्थित होत्या.
पुढे सुळे म्हणाल्या की, आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही किंवा बोलू शकत नाही असे नाही नात्यांचे वाभाडे मी तरी निघू देणार नाही मात्र कोणाचीही पात्रता काढू नये, त्यात आईची तर मुळीच काढू नये, आईच्या बाबतीत मग ती माझी असो वा रोहितची कोणाची असो खपवून घेतली जाणार नाही आमच्या बाबत बोलला आम्ही लहान आहोत खपवून घेऊ पवार साहेबां बाबत बोलला ठीक आहे आंब्याच्या झाडालाच दगड मारला जातो ठीक आहे, मात्र इतकाही उद्रेक करू नका की काहीतरी होईल अशा शब्दात खा सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवारांना दिला आम्हांलाही आरेला कारे बोलता येते मात्र नाती तोडायला काही लागत नाही पण नाती जपायला ताकद लागते मलाही आरेला कारे करता येते, देशभर असलेल्या मोठ्या पक्षाला माझ्याविरुद्ध उमेदवार मिळत नाही, त्यांना आमच्याच कुटुंबातील एका माऊलीला माझ्याविरुद्ध उभा करण्याची वेळ येते अरे वार करायचा असेल तर समोरासमोरून वार करा, कुटुंब फोडून कशाला वार करतात असा देखील सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी भाजपाला उपस्थित केला
ओरिजनल डीएनए सुप्रिया सुळे यांचे
आम्ही पवार कुटुंबात सून म्हणून आलो आहोत, मात्र सुप्रिया सुळे या जन्माने आणि नात्याने पवार आहेत त्यांचे रक्ताचं नातं असून त्यांच्यातच पवारांचे ओरिजनल डीएनए आहेत आणि मी कधी माझ्या नणंदेची आणि माझ्या मुलीची जागा घेणार नाही असे शर्मिला पवार यांनी बोलताना व्यक्त केले.
आजचे बदलले दादा आम्हांला पटत नाहीत
दिल्लीची लोकं येतात पैशांची शक्ती वापरतात, दडपशाहीची ताकत वापरतात, आणि आपल्याच कुटुंबातील एका नेत्याला बाजूला करतात त्या नेत्याचे जे काही असेल ते असेल, त्याच्या स्वतच्या ज्या अडचणी असतील त्या असतील, पण ज्या विचाराच्या विरोधात ज्या नेत्याला आपण सर्वांनी निवडून दिले, निवडणूकीनंतर त्याच नेत्या सोबत जाणे हे पटतंय का ? असा सवाल आ रोहित पवार यांनी उपस्थित करीत देवेंद्र फडणवीसांना पुन्हा यायचे होते, मात्र साहेबांनी ते होऊ दिले नाही, म्हणून त्यांनी पवार कुटुंब फोडले. दबाव तंत्राचा वापर केला. आणि शिवसेना व राष्ट्रवादी फोडली आणि म्हणतायत बघा मी पुन्हा आलो, याला अहंकार म्हणतात अशी टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोहित पवार यांनी केली मी अजित दादांचा फॅन होतो मात्र आज तेच दादा जेव्हा साहेबांवर टीका करतात त्याचं मला दुखः होतंय, आजचे बदलले दादा आम्हांला पटत नाहीत असेही व्यक्त केले.
