October 24, 2025

मनुष्य जीवन परोपकारासाठी समर्पित व्हावे .. सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज

IMG-20240426-WA0097
बारामती : “निराकार प्रभुने आम्हाला हे जे मानव जीवन दिले आहे त्याचा प्रत्यक क्षण मानवतेसाठी समर्पित व्हावा, असा परोपकाराचा सुंदर भाव आपल्या हृदयात उत्पन्न होतो तेव्हा खरं तर अवघी मानवता आम्हाला आपली वाटू लागते.” असे उद्गार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी ‘मानव एकता दिवस’ प्रसंगी भाविक भक्तगणांना संबोधित करताना व्यक्त केले.
त्याच अनुषंगाने येथील सत्संग भावनात मानव एकता दिवस निमित्त विशेष सत्संगाचे आयोजन केले होते त्याच्या प्रमुखस्थानी संत निरंकारी मिशन सातारा झोनचे प्रचारक प्रल्हाद पाटोळे होते.  सदरचा सत्संग सोहळा बुधवार (दि.24) सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शना खाली व बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांच्या सहकार्याने संपन्न झाला. या सत्संग सोहळ्यास बारामतीसह फलटण तालुक्यातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता
यावेळी सत्संगच्या प्रमुखस्थानी असलेले प्रल्हाद पाटोळे यांनी मानव एकता दिवसाचे पावन पर्व बाबा गुरबचनसिंहजी यांनी मानवतेच्या प्रति केलेल्या महान सेवांसाठी समर्पित असून त्यातून प्रेरणा घेऊन निरंकारी जगतातील प्रत्येक भक्त आपल्या जीवनाचे कल्याण करत असल्याचे सांगितले.

You may have missed

error: Content is protected !!