कोणाच्या जाण्याने कोणाचं काही अडत नसतं …..
बारामती : बारामती लोकसभा मतदार संघाच्या लढतीकडे पूर्ण देशाचे लक्ष लागले असतानाच, बारामतीमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे याबाबत सोशल मिडीयावर सध्या एक क्लीप चर्चेत आली आहे, ती म्हणजे वटवृक्ष पालवी फोडत असतो आणि कोणाच्या जाण्याने कोणाचं काही अडतं नसत या आशयाची क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे.
बारामती लोकसभा मतदार संघात खा. सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी लढत येणाऱ्या निवडणुकीत होणार आहे त्यामुळे राजकीय चर्चेला चांगलेच उधान आले आहे यापूर्वी सोशल मिडीयावर एक निनावी पत्र व्हायरल झाले होते आणि आता पवार कुटुंबाचे फोटो असलेली क्लीप व्हायरल झाली आहे त्या क्लीपमध्ये शरद पवार हे वटवृक्ष आणि बाकीचे त्यांच्या बाजूने असलेले पवार कुटुंब आहे तर सुप्रिया सुळे यांच्यासह, शरद पवार, राजेंद्र पवार, सुनंदा पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, रोहित पवार, युगेंद्र पवार हे एकत्र दिसत आहेत त्यामध्ये अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा मात्र फोटो नाही त्यामुळे एकूनच अजित पवार जरी कुटुंबातून बाहेर पडले असले तरी वट वृक्ष पालवी फोडत असतो, कोणाच्या जाण्याने कोणाचे काही अडत नाही अश्या आशयाची ती क्लीप आहे.
