October 24, 2025

संत शिरोमनी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात संपन्न

IMG-20240229-WA0039

बारामती : संत शिरोमनी नरहरी महाराज यांची ७३८ वी पुण्यतिथी बारामती येथील सोनार समाज सेवा संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

या प्रसंगी सुंदर फुलांच्या सजावटीने मंदिर सुशोभित करून सकाळी श्रीकांत त्यारे व शाम क्षीरसागर या दोघांनीही सपत्नीक महाराजांचा अभिषेक व सत्यनारायण महापुजा करून महाराजांची मिरवणूक  पालखीतून सर्व समाज बांधव व भगिनींच्या उपस्थीतीत टाळ मृदुंगाच्या गजरात काढण्यात आली. पालखीचे मंदिरात आगमन झाल्यानंतर डोर्लेवाडीचे ह.भ.प. बाळासाहेब नाळे महाराज यांचे किर्तन झाले.

यावेळी  कार्यक्रमास बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा  सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती होती यावेळी त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या उपस्थित मान्यवर बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा सत्कार समाजाच्या कविता गोकुळ लोळगे  यांच्या हस्ते करण्यात आला तर किर्तनासाठी आलेल्या सर्व संतसज्जनांचा सत्कार सर्व जुन्या व नव्या पिढीतील समाज बांधवानी केला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  किशोर श्रीगंधे, गोकुळ लोळगे, गोपाळ क्षीरसागर,अनिल शहाणे, विठ्ठलराव कूलथे, जितेंद्र शहाणे, सुधीर पोतदार तसेच सर्वच समाज बांधव यांनी परिश्रम घेतले.

या सोहळ्याचा महाप्रसाद शिवाजीराव क्षीरसागर, रघुनाथ बागडे, सुधाकर त्यारे , प्रकाश  अदापुरे याच्या वतीने देण्यात आला. तर मिरवनुक रथ गणेश बनछोड , हार फुले अॅड गणेश  आळंदीकर, किर्तन सेवा   गणेश जोजारे, मंदिरात फुलांचे डेकोरेशन पांचाळ ( निकीता कार्ड्स) यांच्या वतीने करण्यात आला.

You may have missed

error: Content is protected !!