October 24, 2025

निरंकारी सदगुरु माताजीं चे 6 फेब्रुवारी ला बारामतीत आगमन,…..निरंकारी भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण

IMG-20240203-WA0028
बारामती :  नागपूर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्राच्या ५७ व्या वार्षिक निरंकारी संत समागमानंतर निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमीत जी यांच्या मानव कल्याणार्थ प्रचार यात्रे दरम्यान बारामती शहरामध्ये आगमन होत आहे.
सदरचा समागम सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याने समस्त संत निरंकारी परिवारामध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण असून हजारोंच्या संख्येने श्रद्धाळू भक्त या संत समागमाच्या तयारीला लागले आहेत. सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी या संत समागमाची माहिती देताना सांगितले कि मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 ते 8  या वेळेत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर संत समागम संपन्न होईल.
मानवी जीवन अंतर्मनातील शांतीसुखाने परिपूर्ण करत विश्वामध्ये शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याचा कल्याणकारी संदेश जनमानसापर्यंत पोहचविणे हाच या संत समागमाचा उद्देश आहे. हा दिव्य संत समागम सर्वार्थाने यशस्वी व्हावा यासाठी निरंकारी सेवादलाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने तसेच अन्य निरंकारी भक्तगण मोठया तन्मयतेने पूर्वतयारीला लागले आहेत. सद्गुरुंच्या दिव्य वाणीचा लाभ घेण्यासाठी समस्त निरंकारी परिवारामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन छत्र छायेखाली संपन्न होणाऱ्या या संत समागमाला बारामतीसह पुणे, मुंबई, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, संभाजीनगर येथून हजारोच्या संख्येने श्रद्धाळू भक्त उपस्थित राहून सद्गुरूंच्या पावन संदेशाचा लाभ घेणार आहेत.

You may have missed

error: Content is protected !!