October 24, 2025

शारदाबाई पवार महाविद्यालय येथे  राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

AIC_Building

बारामती :शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे दि. 5 व 6 फेब्रुवारी रोजी ‘मायक्रोबियल बायो प्रोस्पेक्टींग फॉर एन्व्हायरमेंटल कंजर्वेशन अँड रेस्टोरेशन’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये पर्यावरण संवर्धन आणि पुनरसंचयन यासाठी सूक्ष्मजैविक संभावना या विषयावरील संशोधन सादर होणार असून त्याकरिता देशभरातील 300 पेक्षा अधिक शास्त्रज्ञ, विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापक यांनी नोंदणी केली आहे. असे परिषदेचे निमंत्रक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी यांनी माहिती दिली.

परिषदेचे समन्वयक सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रो. डॉ. राजेंद्र मराठे यांनी सांगितले की सदर परिषदे करता आयसीएआर, हब, रांची सहसंचालक, डॉ. किशोर कुमार कृष्णानी, एस. ए. एम. ग्लोबल युनिव्हर्सिटी, भोपाळचे अधिष्ठाता, डॉ. सुगंधा सिंग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. करिष्मा परदेशी, तसेच स्कूल ऑफ लाइफ सायन्सेसचे,संचालक डॉ. भूषण चौधरी, यांचे मार्गदर्शन परिषदेतील सहभागींना होणार आहे. प्रदूषण कमी कसे करावे सूक्ष्मजीवशास्त्रीय तंत्रज्ञान कसे वापरावे, परिस्थिती परिसंस्थेचे संरक्षण कसे करावे, या विषयांवर नेमकेपणाने मार्गदर्शन होणार आहे. परिषदेतील उत्कृष्ट पोस्टर सादरीकरणाला बेस्ट पोस्टर अवॉर्ड देऊन गौरवण्यात येणार आहे. सदर परिषद आयोजन करण्याकरिता अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलवडे यांचे मार्गदर्शनाखाली परिषदे करिता महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील आयोजन समितीचे सदस्य डॉ. पी. व्ही. जाधव, डॉ. वाय. बी. फाटके, आयोजक सचिव, डॉ. एस. एस. डांगे, डॉ. व्ही. आर. कोठारी, डॉ. जे. पी. राठोड, आर. यू. राजेनिंबाळकर, एस. एस. कदम आदी आयोजनाकरिता योगदान देत आहेत.

You may have missed

error: Content is protected !!