October 24, 2025

नाविन्यपूर्ण  संशोधन करून  बौद्धिक अधिकार मिळवणे ही काळाची गरज – डॉ. सी. डी. लोखंडे

IMG-20240131-WA0074

बारामती :  ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे शारदाबाई पवार महिला महाविद्यालय  बारामती येथे “बौद्धिक संपदा अधिकार व जागरुकता आणि पेटंट दाखल करण्याची प्रक्रिया” या विषयावरती नॅशनल इनोव्हेशन अँड स्टार्टअप पॉलिसी आणि संस्थेची इनोव्हेशन कौन्सिल सेल तर्फे एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, डी. वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूरचे आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे आधीष्ठाता डॉ. चंद्रकांत लोखंडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. लोखंडे हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक आहेत. त्यांनी आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त भारतीय पेटंट, ३० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पेटंट, ९०० च्या वरती आंतरराष्ट्रीय शोध निबंध प्रकाशित केले आहेत. डॉ. लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या बुद्धीमत्तेचे कौशल्याचा वापर करून आपण बौद्धिक मालमत्ता अधिकार कसे मिळवू शकतो आणि येणारा काळ हा तुमचाच कसा आहे, हे पटवून दिले.

यावेळी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे रामानुज फेलो  डॉ. जयवंत गुंजकर, भौतिकशास्त्र विभागप्रमुख, डॉ. विनायक जमदाडे, शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ श्रीकुमार महामुनी यांनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्राला १४ वेगवेगळ्या महाविद्यालयांतील २७० विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला.

 उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक मध्ये डॉ. तानाजी गुजर यांनी या चर्चासत्राचे उद्दिष्ठ सांगितले.  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपप्राचार्य प्रा. डॉ मोहन निंबाळकर, डॉ. वैशाली शिंदे, डॉ. हरिचंद्र निकुळे, डॉ. जयंत राठोड, डॉ शंकू, प्रा. सुनील भगत, प्रा. स्नेहा तावरे, प्रा. सई देशपांडे, प्रा. कोमल भोसले आणि रतीलाल गायकवाड, दत्ता खराडे, उद्देश वळकुंदे,  अविनाश डावखर, राजेंद्र जाधव, सुहास गवारे यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, सीईओ निलेश नलावडे यांचे आयोजनासाठी मार्गदर्शन लाभले.

You may have missed

error: Content is protected !!