October 24, 2025

बारामती कराटे क्लब तर्फे ब्लॅक बेल्ट परीक्षा यशस्वीरित्या संपन्न

IMG-20231231-WA0020
बारामती : बारामती कराटे क्लबच्या वतीने व सिकोकाय कराटे इंटरनॅशनल इंडिया व कराटे इंडिया ऑर्गनायझेशनच्या ब्लॅक बेल्ट परीक्षा घेण्यात आल्या त्या यशस्वी संपन्न झाल्या.
बारामती कराटे क्लबच्या खेळाडूंकरीता परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 32 खेळाडूंनी ब्लॅक बेल्ट फस्ट दान, 2 खेळूनी  ब्लॅक बेल्ट सेकंड दानची पदवी तर 2 खेळूनी ब्लँक बेल्ट थर्ड  दानची पदवी यशस्वीपणे मिळवली.
सर्व खेळाडूंनी दिनांक 26 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत सकाळी 7:00  ते सायंकाळी 7:00 यावेळेत विविध कराटे प्रात्यक्षिके करीत ब्लॅक बेल्ट परीक्षेत यश संपादन केले. त्यांना साउथ इंडिया कराटे फेडरेशनचे अध्यक्ष हंसी भरत शर्मा व सिको काय महाराष्ट्र सचिव मिननाथ रमेश भोकरे यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट देण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे-  अमित  जनजोतरे, अर्पित नेवारे, आदित्य यादव, अजिंक्य घाडगे, विनीत  घोळवेडगे, आर्यन  चौगुले, यशराज कदम, श्रेयश वीर, विराज वीर, गायत्री घाडगे, आराध्या वाघमरे, सानिका सणस, सानिया सय्यद,यश देशमुख, अन्वय भोसले, शौर्य शिंदे,  यश नाईकवाडे, अनुष्का सपकाळ, संचिता धाडवे, श्रेया  तावरे, श्रावणी नाळे, अनिशा.नाईकवाडे, अंकुर खंडाळे, शौर्य खंडाळे, सावी शहा, रोहन भोसले, अनिस मुल्ला, सौजन्य कराडी, चंदना कराडी,  संकेत लोभे, शत्रुंजय शर्मा,  ऐश्वर्या म्हादेव, विनीत घोळवे,  मंथन भोकरे, व अनिकेत  जावळेकर यांनी ब्लॅक बेल्ट सेकंद दान  तसेच नवनाथ लवंगारे, सुशांत पोल यांना थर्ड दान ब्लॅक बेल्ट देण्यात आला. सर्व यशस्वी खेळाडूंना बारामती कराटे क्लबचे प्रमुख प्रशिक्षक मिननाथ रमेश भोकरे व क्लबच्या सचिव शुभांगी भोकरे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.

You may have missed

error: Content is protected !!