October 24, 2025

केंद्रीय पथकाकडून बारामती तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी

IMG-20231213-WA0041
बारामती  : केंद्रीय पथकाकडून बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी, उंडवडी सुपे, देऊळगाव रसाळ, आणि लोणी भापकर या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली.
पथकामध्ये केंद्रीय अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकारी सरोजिनी रावत, केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरन, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, महावितरण बारामती ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता मोहन सूळ आदी उपस्थित होते.
केंद्रीय पथकाकडून जळालेली पीके, कोरड्या पडलेल्या विहिरी, शेतकऱ्यांसाठी सद्यस्थितीत असलेल्या पाण्याची व्यवस्था, पाण्याच्या पातळीची खोली, विहिरी, बोअरवेलचे प्रमाण,  पिण्याचे पाणी,  त्याची साठवणूक, जलयुक्त शिवाराची कामे, जनावरांसाठी लागणारा चारा, पिकांचे नुकसान आदींबाबत शेतकरी, लोकप्रतिनिधी, अधिकारी आदींशी चर्चा केली.  या पाहणी दौऱ्याच्या आधारे दुष्काळाबाबत केंद्र शासनास अहवाल सादर करण्यात येणार आहे.

You may have missed

error: Content is protected !!