दुकानांवर मराठी पाट्या लावा, अन्यथा होणार कारवाई
बारामती : बारामती शहरातील नगरपरिषद हद्दीतील सर्व दुकानदार व आस्थापना चालकांनी आपल्या दुकानाचा व आस्थापनाच्या पाट्या मराठीत लावाव्यात अन्यथा कारवाई करण्यात येईल असे आवाहन नागपालीकेचे मुख्यधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.
शहरातील सर्व व्यापारी संघटना तसेच शहरातील सर्व लहान मोठे दुकानदार व आस्थापना ज्यांनी आपल्या दुकानाच्या नावाच्या पाट्या लावल्या आहेत, अशा सर्वांना कळविण्यात येते की, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नगरपरिषद हद्दीतील सर्व दुकाने, संस्था व आस्थापनावरील पाट्या सुरुवातीला मराठी भाषेमध्ये देवनागरी लिपीमध्ये असावी. तसेच मराठी भाषेतील नावाचा आकार इतर भाषेतील नावाच्या आकारापेक्षा लहान असू नये. सदर बाबत अंमलबजावणी करावी. अन्यथा मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल, जाहीर आवाहन मुख्यधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.
तेव्हा आपल्या दुकान आणि आस्थापनांचा फलक ( बोर्ड ) तात्काळ बदला अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
