महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न
बारामती : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक बारामती या ठिकाणी सामुदायिक त्रिशरण पंचशील व पूजा पाठाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यादरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून पूजापाठाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली बारामतीतील शासकीय अधिकारी यांच्यावतीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावरती प्रकाश टाकत त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांनी सुद्धा आपल्या आपल्या विचारातून महामानवास आदरांजली अर्पित केली.
यावेळी पूजापाठाच्या कार्यक्रमाला उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती गणेश इंगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर , पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, तहसीलदार गणेश शिंदे, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ , मा. गटनेते सचिन सातव, तलाठी चेतन पोळ , त्रिरत्न नागरी पतसंस्थेचे चेअरमन सुधीर सोनवणे , मूलनिवासी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सचिन साबळे, बसपाचे काळूराम चौधरी, माजी नगरसेविका अनिता जगताप, मा उपनगराध्यक्ष विजय खरात, सामाजिक कार्यकर्ते नितीन शेलार सामाजिक कार्यकर्ते निलेश मोरे, विशाल जाधव, बबलू जगताप, पत्रकार सुनील शिंदे साधू बल्लाळ, अँड विनोद जावळे, रमेश साबळे , वि. श्री. कांबळे , संजय वाघमारे, देविदास गायकवाड, अक्षय मेमाणे, भारत सोनवणे, प्रा रमेश मोरे , आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे , फैयाज शेख, प्रा सरोदे , व समाज बांधव मोठ्या प्रमाणात अभिवादनाच्या कार्यक्रमास उपस्थित होते.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन समता सैनिक दल, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती व समिती अध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे, कार्याध्यक्ष भास्कर दामोदरे, उपाध्यक्ष विराज अवधूते, खजिनदार विशाल गायकवाड, सहखजिनदार शंकर सोनवणे, उपाध्यक्ष संदीप रणदिवे, आदित्य सोनवणे, स्वप्निल गायकवाड ,शुभम गायकवाड ,आदित्य साबळे ,साहिल मोरे, व शुभम काकडे यांच्यावतीने करण्यात आले होते.
