October 24, 2025

माणुसकीचे दर्शन म्हणजे आई प्रतिष्ठान : युगेंद्र पवार 

IMG-20231113-WA0042
बारामती :  सामाजिक जान ठेवत आई प्रतिष्ठानने शालेय विद्यार्थ्यांना, महिला  व गरीब कुटूंबांना वर्षभरात विविध उपक्रमाच्या माध्यमातून केलेली मदत म्हणजे माणुसकीचे दर्शन असून दिवाळीमध्ये फराळ, अभ्यंगस्नान वाटप व महिलांना साडी वाटप करून आई प्रतिष्ठानने कौतुकास्पद सामाजिक कार्य केल्याचे मत विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांनी व्यक्त केले.
आई प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी निमित्त एक हजार कुटूंबांना फराळ किट, अभ्यंगस्नान किट  आणि महिलांना साड्या वाटप युगेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी युगेंद्र पवार बोलत होते या प्रसंगी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. अध्यक्ष सुभाष ढोले, इम्तियाज शिकीलकर, माळेगाव कारखान्याचे संचालक राजेंद्र ढवाण, उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, मा. नगरसेवक कुंदन लालबिगे, सिद्धनाथ भोकरे, नितीन बागल व निलेश मोरे, निलेश पलंगे, निलेश इंगुले, बन्सीलाल मुथा, दिलीप शिंदे, पांडुरंग चौधर ,निलेश कोठारी व इतर मान्यवर  उपस्थित होते. तर या वेळी उपस्थित विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
पैसा कमविणे सोपे असते मात्र मिळवलेला पैसा स्तकर्मी लावून आशीर्वाद मिळवणे अवघड आहे परंतु सत्यव्रत काळे व आई प्रतिष्ठानने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून  गोरगरिबांचे आशीर्वाद मिळवले  आहेत व हेच कार्य आदर्शवत असल्याचे पवार यांनी सांगितले.
१ जानेवारी पासून सामाजिक कार्यास दरवर्षी सुरुवात होते, शालेय विद्यार्थ्यांनी सायकल वाटप, शालेय साहित्य वाटप, बचत गटांना आर्थिक सहाय्य, देवदर्शन सहल , साड्या वाटप  करत असताना गोर गरिबांची दिवाळी गोड व्हावी म्हणूनच गेल्या पाच वर्षांपासून दिवाळीमध्ये सदर उपक्रम केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी करीत असल्याचे आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यव्रत काळे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले, तर दिवाळी किट व साड्या दिवाळी भेट मिळाल्यानंतर महिलांनी आनंद व समाधान व्यक्त केले

You may have missed

error: Content is protected !!