कॉंग्रेस पक्षाकडे बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीची मागणी.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने जातनिह्यात जनगणना रथयात्रेचे आयोजन.
कॉंग्रेस पक्षाकडे बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीची मागणी.
बारामती : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग तर्फे 4 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जातनिह्यात जनगणना रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे.तसेच कॉंग्रेस पक्षाकडे बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीची देखील मागणी केली असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.
तर सदर कॉंग्रेसच्या वतीने आयोजित ही यात्रा कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळापासून सुरू करण्यात येणार असून, ही यात्रा महाराष्ट्रमध्ये साधारण 3500 कि.मी. असणार आहे. या यात्रेच्या शुभारंभ देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अखिल भारतीय प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभाग राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन जयसिंग यादव तसेच या यात्रेचे पूर्ण नियोजन महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे, तसेच या यात्रेला काँग्रेस पक्षाचे आजी माजी मंत्री, खासदार आमदार व कार्यकर्ते पदाधिकारी हे सहभागी होणार आहेत, या यात्रेची सांगता सभा पुणे येथे होणार असून त्यासाठी काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभाग राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजयसिंग यादव यांच्या विनंतीवरून, राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे उपस्थित राहणार आहेत, तसेच यावेळी ओबीसी विभागा तर्फे आगामी लोकसभेसाठी जागा मागण्यात आल्या यामध्ये ओबीसी विभागाला बारामती, भिवंडी, जालना, अहमदनगर, जळगाव, हिंगोली, सातारा, यवतमाळ, धुळे, माळेगाव देण्याबाबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती ओबीसी विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रोहित बनकर यांनी दिली.
गेली अनेक वर्षापासून बारामती लोकसभा मतदार संघ हा पवारांचा अभेद्य बालेकिल्ला आहे, मात्र त्या मतदार संघासाठी कॉंग्रेस पक्षाकडे त्यांच्याच ओबीसी सेलच्या वतीने आगामी लोकसभेसाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी कॉंग्रेस पक्षाकडून लोकसभेच्य गोळा बेरजेला सुरुवात करण्यात आल्याची देखील नागरिकांमध्ये चर्चा आहे.
