बारामतीत तीन दिवसात ६७५ नागरिकांची आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी

बारामती : स्व.धनंजय देशमुख यांच्या स्मृतींचा उजाळा होत रहावा यासाठी स्व.धनंजय देशमुख ट्रस्टच्या वतीने शहरातील पाटस रोड येथे सुरू असलेल्या शिबिरामध्ये तीन दिवसात ६७५ नागरिकांची आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी करण्यात आली.
मा. नगरसेवक जयसिंग देशमुख व आदित्य हिंगणे,महात्मा फुले तरुण मंडळ व स्व.धनंजय देशमुख मित्र परिवार यांच्या वतीने वर्षभर लोक हिताचे उपक्रम घेतले जातात.यामध्ये मोफत मतदार नोदणी,आयुष्मान भारत योजना असे विधायक उपक्रम राबवले जातात नुकत्याच झालेल्या आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीसाठी पाटस रोड परिसरातील अवचटइस्टेट, महादेव मळा, पतंगशाह नगर,देशमुख वस्ती , हिंगणे वस्ती ,अनंत आशा नगर , समर्थ नगर , बनकर वस्ती , सद्गुरु नगर , गायकवाड मळा येथील नागरिकांनी आयुष्मान भारत योजने अंतर्गत नोंदणी केली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपला मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असणे गरजेचा आहे.असे आयोजक आदित्य हिंगणे यांनी सांगितले.