October 24, 2025

बावनकुळे तिकीट द्यायला देखील लायक नाहीत ….बावनकुळे यांचा शरद पवारांनी घेतला समाचार

sharad-pawar

बारामती : चंद्रशेखर बावनकुळे यांचे त्यांच्याच पक्षात काय स्थान आहे हे मला माहित नाही  बावनकुळे हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत मात्र मागच्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांच्याच पक्षाने त्यांना तिकीट देखील दिले नव्हते, ते तिकीट इतपत देखील लायक नाहीत अश्या व्यक्ती बद्दल मी काय बोलणार अश्या बोचऱ्या शब्दात माजी केंद्रीय कृषीमंत्री व खा. शरद पवार यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समाचार घेतला.

५१ टक्के मते घेऊन आम्ही बारामती जिंकणार असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणीत आहेत, यावर पवारांना पत्रकारांनी छेडले असता पवार बोलत होते. बारामतीत पत्रकारांशी माजी केंद्रीय कृषी मंत्री व खा. शरद पवार बोलत होते, पुढे पवार म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे याचे त्यांच्याच पक्षात आणि जनमानसात काय स्थान आहे हे मला माहित नाही, मात्र मागच्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांच्याच पक्षाने त्यांना तिकीट देखील दिले नव्हते, ते तिकीट देण्याइतके देखील लायक नाहीत अश्या व्यक्ती बद्दल मी काय बोलणार अश्या शब्दात खा. शरद पवार यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समाचार घेतला.  बारामतीचे नाव घेतल्या शिवाय बातमी होत नाही, महाराष्ट्र आणि देशात बारामतीचे वेगळे महत्व आहे म्हणूनच बावनकुळे बारामतीचे नाव घेत असावेत असाही पवारांनी बावनकुळे यांना चिमटा घेतला.

You may have missed

error: Content is protected !!