October 24, 2025

बारामतीत पडळकरांच्या प्रतीमेला जोडे मारून निषेध

IMG_20230921_162908 (1)

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी अपशब्द व्यक्त केल्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून  निषेध करण्यात आला.

बारामती शहर व तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने शहरातील भिगवन चौकात पडळकर यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी तालुकाअध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, माळेगावचे जेष्ट संचलक केशवराव जगताप, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, नितीन शेंडे,  माजी गटनेते सचिन सातव, माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, सुभाष सोमाणी, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, बाजार समितीचे सभापती सुनील पवार, माजी नगरसेवक अभिजित काळे, गणेश सोनवणे, तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

पडळकर हे जाणीवपूर्वक पवार कुटुंबीयांच्या विरोधात बोलून मिडीया स्टट करण्यासाठी बेताल वक्तव्य करीत आहेत,   तसेच समाजाने दिलेल्या संधीचे सोने करण्यापेक्षा, बेताल वक्तव्य करून समाजाने दिलेल्या संधीची माती करण्याचे काम आपण करीत आहात त्याचा आम्ही बारामतीकर जाहीर निषेध व्यक्त करतो, यापुढे बारामतीकरांच्या वतीने जशास तसे उत्तर दिले जाईल, यापूर्वीच बारामतीकरांनी निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा दाखवुन दिली आहे,  तुम्ही स्वतःच्या हिमतीवर निवडून दाखवा मग बेताल व्यक्तव्य करा असे आव्हान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते केले.

You may have missed

error: Content is protected !!