October 24, 2025

बारामतीच्या चार कराटे खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेत निवड

WhatsApp Image 2023-09-18 at 7.07.54 PM
बारामती  : बारामतीचे चार कराटे खेळाडूं राष्ट्रीय स्पर्धेत आपली कामगिरी दाखविणार असून दि.  20 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर  रोजी देहरादून, उत्तरखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय कॅडेट व ज्युनिअर कराटे स्पर्धेत बारामती शहरातील बारामती कराटे क्लबच्या या चार खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय कॅडेट व ज्युनिअर कराटे स्पर्धेमध्ये बारामती शहरातील बारामती कराटे क्लबच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले त्याचे सर्वत्र कौतुक आहे. राष्ट्रीय कराटे स्पर्धेत महाराष्ट्र संघात रोहन भोसले ( 61 किलो, अतिल, 16 – 17  वयोगटात ), श्रुती भारगड ( 54 किलो अतिल, 14 – 15 वयोगटात ), अनिरुध मोरे ( 76 किलो अतिल, 16 – 17 वयोगटात ) आणि  मंथन भोकरे – सिनिअर टिम कुमिने या गटात महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. महाराष्ट्रचे अध्यक्ष सलाउद्दीन अन्सारी, सचिन गाडे,  हंशी भरत शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले हे सर्व खेळाडू बारामती कराटे क्लबचे प्रमुख मिननाथ भोकरे  यांच्याकडून कराटे प्रशिक्षण घेत आहेत.

You may have missed

error: Content is protected !!