सामाजिक कार्यकर्ते घनश्याम देवकाते यांच्या वाढदिवसानिमित्त युवकांचे रक्तदान
बारामती : निरावागज (ता. बारामती ) येथील सामाजिक कार्यकर्ते घनश्याम देवकाते यांच्या वाढीवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराने रक्तदान केले.
सदर रक्तदान येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीत पार पडले. देवकाते हे गेल्या 7 वर्षांपासून वाढदिवसानिमित्त मित्रपरिवारासोबत रक्तदान करत आहेत. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, यातून सामाजिक भान जपत अनेक युवकांनी केलेल्या रक्तदानामुळे कित्येक रुग्णांचे प्राण वाचतात. रक्तदात्यांमध्ये स्वतः घनश्याम देवकाते,प्रसाद लकडे महेश देवकाते, मंगेश टिळेकर, युनूस शेख, अक्षय देवकाते, रोहित देवकाते, अजित देवकाते, यांचा समावेश होता. यावेळी देवकाते यांनी रक्तदान करून वाढदिवस साजरा केला. यावेळी विपुल ढवाण, गणेश देवकाते, सौरभ देवकाते, सागर देवकाते, ऋतुराज व्होरकाटे, श्रीनिवास कोकरे, हरी देवकाते, प्रतीक देवकाते, सागर कांबळे, मामजी देवकाते, राहुल वीर, विजय माने, ऋषिकेश देवकाते, रोहित लोंढे, हनुमंत देवकाते, राज बाचकर आदी उपस्थित होते.
