बारामती नगर परिषदेतील अभियंत्यांचा सन्मान.
अभियंत्यांचे प्रेरणास्थान असलेल्या भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीदिन चंदूकाका सराफ आणि सन्स यांच्या वतीने बारामती नगर परिषदेतील अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला.
देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी भारतात १५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय अभियंता दिन साजरा केला जातो याचेच औचित्य साधत चंदूकाका सराफ आणि सन्स यांच्या वतीने बारामती नगर परिषद येथे अभियंता दिन साजरा करण्यात आला यावेळी चंदुकाका सराफ आणि सन्स यांच्या वतीने बारामती नगर परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला. या मध्ये स्वतः अभियंता असणारे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, नगररचनाकार रमेश अवताडे, उपमुख्याधिकारी पद्मश्री दाईंगडे, नगर अभियंता संजय सोनावणे, विपुल कोरपड, आदित्य बनकर, सुप्रिया बोराटे, सचिन खोरे, प्रमोद भापकर, स्नेहल घाडगे, दिपाली ठाकूर, ऋषिकेश साळी, शंतनू बारवकर, अक्षय नाईक, रियाज काझी, विक्रम बालगुडे व इतर नगरपरिषदेचे सर्व अभियंता यांचा सन्मान करण्यात आला.
सर विश्वेश्वरय्या यांचे संपूर्ण जीवनचरित्र हे अभियंत्यांना सकारात्मक ऊर्जा देणारे असून शहरातील नागरिकांना सेवा सुविधा पुरविण्यात येणाऱ्या साधारणत: ८५ टक्के नागरी सुविधा या अभियांत्रिकी विभागामार्फत पुरविल्या जात असल्याने अभियंत्यांची जबाबदारी मोठी असते याच हेतूने सर्व अभियांत्यांच्या कार्याला सलाम करण्यासठी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमा प्रसंगी चंदूकाका सराफ आणि सन्स यांच्या वतीने व्यवस्थापक रोहित अवधे, सोनाली जगताप, विनोद जगताप, सचिन जाधव उपस्थित होते.
