October 24, 2025

शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

IMG-20230916-WA0038 (1)

बारामती :  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती महोत्सवानिमित्त गरजू शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा संपन्न झाला.

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती शैक्षणिक दृष्ट्या कशी साजरी करता येईल त्याचा विचार करून झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्य संघटक तानाजी पाथरकर यांच्या वतीने बारामती शहरातील मिशन हायस्कूल व शाहू हायस्कूल या शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप तसेच शैक्षणिक वापरासाठी वह्याचे वाटप करून अण्णाभाऊ साठे जयंती गेले अनेक वर्षांपासुन साजरी करण्यात येत आहे.

यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, कै. वस्ताद बाजीराव काळे तालीम दहीहंडी संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ऋतुराज काळे, शिक्षण मंडळ माजी सभापती, एम. डब्ल्यू. जोशी, सामाजिक कार्यकर्ते संतोष सातव, भारतीय पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष तैनुर शेख, पत्रकार सोमनाथ कवडे, सुरज देवकाते, गौरव अहिवळे, स्वप्नील कांबळे, शुभम गायकवाड, देवानंद मोरे, जमिर शेख, आदी मान्यवर उपस्थित होते.

गेली दहा वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम राबवला जात असून गरीब कुटुंबातील विद्यार्थी हा मूलभूत सुख सुविधामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये हा त्यामागचा उद्देश असून गरिबातल्या गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावं आणि त्यांना आपली शैक्षणिक सामाजिक  परिस्थिती सुधारावी हा त्या मागचा उद्देश आहे असे आयोजक तानाजी पाथरकर यांनी सांगितले

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन सकट, अभिमन्यू लोंढे, सोमनाथ झेंडे, सुरज देवकाते यांनी परिश्रम घेतले

You may have missed

error: Content is protected !!