अजब नगरपालिकेचा गजब कारभार
बारामती : नगरपालिकेत अनेक कामगार कामावर आहेत मात्र कामावर असूनही मुळी कामच करायचेही नाही अशी अवस्था बारामती नगरपालिकेच्या अनेक कामचुकार कामगारांची झाली आहे.तर यावर नगरपालिका प्रशासन अधिकारी का गप्प आहेत असा सवाल उपस्थित होतो आहे.
बारामतीचे शिल्पकार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामतीच्या नगरपालिकेसाठी बारामतीच्या नावलौकिकात भर पडेल अशी भव्य वास्तू बांधली आहे मात्र त्या भव्य वास्तूमधील अनेक कामचुकार कामगार कामाच्या नावावर पसार झालेले असतात तर साहेब आणि कामगार कामावर असतात मात्र ते येऊन हाजेरी लावून पसार झालेले असल्याचे चित्र आहे.
फिल्डवर असलेल्या कामगाराने कार्यालयीन कामावर बदली घ्यायची आणि सकाळी हजेरी लावल्या नंतर दिवसभर कामावर असूनही कामच करायचे नाही मात्र इमारतीत विनाकारण भटकायचे तसेच चहाच्या टपरीवर भटकत राहायचे असेही अनेक कामगार नगरपालिकेच्या परिसरात मोकाट फिरताना दिसत आहेत. तर प्रशासन अधिकारी यांनी कामचुकार कामगारांना कार्यालयीन कामची चौकशी केली असता त्यांच्याच विरोधात हे जेष्ठ यांच्याकडे मी तुमची तक्रार करणार मी त्यांचा माणूस आहे, म्हणून प्रत्यक्ष चोरच उलट्या बोंबा मारताना दिसत आहेत. त्यामुळे तेरी भी चूप, मेरी भी चूप, अशी अवस्था झाल्याचे निदर्शनास आले.
भव्य नगरपालिकेच्या वास्तुमध्ये या गायब झालेल्या कामगारांचे अनेक भव्य पराक्रम सुरु असतात अशी गावभर नागरीकांमध्ये चर्चा आहे. वसुलीच्या कारणाने, कार्यालयीन कामाच्या कारणाने तसेच इतर अनेक कारणाने अनेक कामगार कार्ताव्यात कसूर करीत असल्याचे चित्र आहे. तर या कर्तव्यात कसूर करणाऱ्या कामचुकार कामगारांवर मुख्याधिकारी का कारवाई करीत नाहीत अशीही नागरिकांमध्ये चर्चा आहे.
बारामतीकरांच्या भरलेल्या करांवर हे मुजोर कामचुकार कामगार टवाळक्या पिटत फिरत आहेत त्यांच्या मुख्याधिकारी यांनी वेळीच मुसक्या आवळाव्यात अशी चर्चा बारामतीच्या नागरिकांमध्ये आहे.
