October 24, 2025

बारामतीत भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव उत्साहात साजरा

IMG-20230910-WA0055
बारामती :  नाथपंथी गोरक्षनाथ यांचे शिष्य भगवान वीर गोगदेव यांचा जन्मोत्सव बारामतीत उत्साहात साजरा करण्यात आला
नागपंचमी दिवशी पवित्र निशाणची स्थापना करण्यात आली व दि 9 सप्टेबर रोजी ज्येष्ठ नगरसेवक किरण  गुजर, अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, मा. नगरसेविका अनघा जगताप, मा. नगरसेवक राजेंद्र बनकर, मा. नगरसेवक जयसिंग देशमुख,अॅड सुधीर पाटसकर,   अॅड. चंद्रकांत सोकटे,ओंकार देशमुख यांचे शुभहस्ते मिरवणूक शुभारंभ झाला या मिरवणूकत  पुणे, मुंबई अहमदनगर, दौंड, इंदापूर, कोल्हापूर सातारा येथून भाविक सहभागी झाले होते यावेळी पवित्र निशाणास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती व क्रेनने पुष्प वर्षा करण्यात आला.
मिरवणुकीचे वस्ताद विनोद माने यांनी गोरक्षनाथ मूर्तीस पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचे स्वागत केले तर गांधी चौक येथे यादगार फाउंडेशनचे फिरोज बागवान यांनी व त्यांचे सहकारी यांनी व सामाजिक कार्यकर्ते कैलास सावंत यांनी मिरवणुकीचे स्वागत करून गोरक्षनाथ व गोगदेव मूर्तीस पुष्पहार अर्पण केले
यावेळी निशाण आखाड्याचे अध्यक्ष अॅड धीरज लालबीगे, संजय मुलतानी,आरोग्य निरीक्षक अजय लालबिगे, धर्मेंद्र कागडा, गोपाळ वाल्मिक,राजेश लोहाट, पत्रकार सुरज देवकाते, किरसपाल वाल्मिकी,योगेश लालबिगे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निशाण आखाड्याचे प्रदीप लालबिगे, साजन लालबिगे, मुकेश वाघेला, निखिल वाल्मिकी, राज लालबिगे, प्रीतम लालबिगे, शुभम मुलतानी, प्रतीक लालबिगे, करण मुलतानी, महमंद शेख, मनोज तुसबड,  बळवंत झुंज, परवेश बागडे, विक्रांत पवार, आकाश वाडीले, अतिष लालबिगे, कुणाल लालबिगे, शफीक शेख, रज्जक शेख, देवेश लोहाट,सचिन वाल्मिकी शुभ्रतो झुंज, अनिकेत सोंलकी, अमन चव्हाण, कपिल सोलंकी ओंकार देवकाते, रणधीर लोहाट,उत्तम धोत्रे संजय पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

You may have missed

error: Content is protected !!