बारामतीत कै.वस्ताद बाजीराव काळे तालीम दहीहंडी संघाची दहीहंडी उत्साहात संपन्न.
बारामती : कै.वस्ताद बाजीराव काळे तालीम दहीहंडी संघ बारामती, चा दहीहंडी मोहोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला, तर ही दहीहंडी भैरवनाथ दहीहंडी संघ मेखळी यांच्या गोपाळ कालांनी फोडली असून रोख 11000 रुपयांचे बक्षीस आणि ट्रॉफीचे मानकरी ठरले.
यावेळी दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन माजी जेष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बारामती शहर पोलिस निरीक्षक दिनेश तायडे, मा. नगरसेवक सुधीर पानसरे, मा. नगरसेवक बाळासाहेब जाधव मा. नगरसेवक अमजद बागवान, शुभम ठोंबरे, आदींनी तसेच इतर अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेटी दिल्या.
आमच्या या दहीहंडी संघाचे महत्व म्हणजे बारामतीतील एकमेव नोंदणीकृत दहीहंडी संघ असून संघाच्या वतीने दहीहंडी सांस्कृतिक आणि पारंपारिक उद्देश ठेवून साजरी केली जात असल्याचे आयोजक कै.वस्ताद बाजीराव काळे तालीम दहीहंडी संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ऋतुराज अर्जुनराव काळे यांनी सांगितले.
तर दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी तरुणानांचा मोठा उत्साह पाहिला मिळाला. दहीहंडी उत्साव यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष निखिल जाधव, माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर काळे, उपाध्यक्ष रणजित काळे, पूर्णानंद काळे, यश काळे, देवव्रत काळे, साहिल शिंदे, युवराज काळे, चिंटू जाधव, विशाल काळे, अक्षय पवार, सुशांत काळे, कृष्णा शिंदे, शाहू काळे, उत्तम धोत्रे, राहुल काळे, संजय काळे, लखन काळे, विपुल काळे, ओम काळे, सुजल काळे, सचिन बोराटे, संतोष साळुंखे, ओंकार पवार, शैलेश परमाने, संदिप झोंड, लाला शेख, गजानन नाळे, अमोल शिंदे, बापु लाळगे, विशाल साळुंखे, दाऊद शेख, निलेश शेळके, युवराज खिराडे, राजवीर काळे, अजय जाधव, संजय मुसळे यांनी परिश्रम घेतले.
तर संस्थापक अध्यक्ष डॉ. ऋतुराज अर्जुनराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कै.वस्ताद बाजीराव काळे तालीम दहीहंडी संघ बारामती च्या गोपाळ कालांनी जेजुरी येथील शिवसेना दहीहंडी उत्सव मंडळ, अखिल मंडई दहीहंडी उत्सव मंडळ पुणे, संयुक्त शुक्रवार पेठ दहीहंडी उत्सव मंडळ पुणे, डॉट क्रिप्ट शुक्रवार पेठ दहीहंडी उत्सव मंडळ पुणे, कसबा पेठ दहीहंडी उत्सव मंडळ पुणे अशा एकूण पाच दहीहंडी फोडण्याचा मान पटकाविला.
