October 24, 2025

नगर परिषदेच्या वतीने पर्यावरण पूरक गणपती मूर्ती निर्मिती कार्यशाळा 

IMG-20230908-WA0191
बारामती : माझी वसुंधरा अभियान ४.० व स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी बारामती नगरपरिषद प्रयत्नशील असते त्याचाच भाग म्हणून पर्यावरण जागृती व प्रदूषणाच्या दुष्परिणामाची जाणीव विद्यार्थ्याना व्हावी यासाठी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या संकल्पनेतून यंदाचा गणेश उत्सव पर्यावरणपूरक व्हावा या हेतूने बारामती नगर परिषदेच्या वतीने विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल बारामती येथे इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याची एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आपल्या घरी पर्यावरण पूरक मातीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी या हेतूने, बारामती नगर परिषदेच्या वतीने शाडूच्या मातीपासून गणपती बनवा आणि पर्यावरणाचा वाचवा या उद्देशाने या कार्यशाळेच्या आयोजन करण्यात आले होते.
प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या गणेश मूर्तीच्या विसर्जनानंतर त्या पाण्यात विघटन होण्यास खूप कालावधी लागतो. तसेच त्यावर केलेल्या रंगामध्ये विविध केमिकलचा वापर केला जातो, त्यामुळे ज्या नदी, तलाव, कालवा, विहीर, यामध्ये त्यांचे विसर्जन होते ते पाणी प्रदूषित होऊन जलचर प्राणी व वनस्पतींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हे टाळण्यासाठी माती पासून बनवलेल्या गणेश मूर्तीची प्रतिस्थापना करावी असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
 या कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला यावेळी त्यांनी पर्यावरण पूरक शाडू मातीची मूर्तीची स्थापना का करावी यामुळे पर्यावरण रक्षणासाठी कसा हातभार मिळतो याचे महत्त्व विद्यार्थ्यांना बारामती नगर परिषदेचे कर व प्रशासकीय अधिकारी संतोष तोडकर यांनी सांगितले सर्व विद्यार्थ्या समवेत या कार्यशाळेत जलप्रदूषण व वायू प्रदूषणाला आळा बसावा म्हणून कोणत्याही केमिकलचा वापर न करता शाडू मातीपासून या गणेश मूर्ती बनविन्यात आल्या.या वेळी विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य राधा कोरे  तसेच बारामती नगर परिषदेचे कर व प्रशासकीय अधिकारी संतोष तोडकर, महिला बालकल्याण विभागाच्या कविता खरात,कलाशिक्षक मनोज कुंभार, सुधीर जैन, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गणपतीच्या शाडूच्या मूर्ती तयार केल्या ते रोहित सोनवणे आदी उपस्थित होते तसेच सर्व विद्यार्थ्यानी या कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

You may have missed

error: Content is protected !!