आद्यक्रांतिकारक उमाजीराजे नाईक जयंती उत्साहात साजरी
बारामती : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी आद्यक्रांतिकारक उमाजीराजे नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आद्यक्रांतिकारक उमाजीराजे नाईक आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना उमाजीराजे यांच्या गौरवशाली आणि क्रांतिकारी कार्याला जयंती महोत्सव समितीचे सदस्य काळुराम चौधरी, प्रा.रमेश मोरे, शुभम अहिवळे यांनी उजाळा देत. उपस्थितींना उमाजीराजे जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी ॲड.सुशिल अहिवळे,किरण खोमणे,तुषार चव्हाण,गणेश तावरे,निलेश खोमणे,विठ्ठल चव्हाण,प्रवीण जगताप,राजू सवणे,नाना जाधव,एकनाथ चव्हाण,गणेश मदने,सागर बंडलकर,शहाजी भिसे,किशोर मदने,दत्तात्रय जाधव,संभाजी चव्हाण उपस्थित होते.
दरम्यान,या कार्यक्रमाचे आयोजन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे सदस्य गणेश सोनवणे,गौतम शिंदे,दिनेश जगताप,गजानन गायकवाड,विश्वास लोंढे,सोमनाथ रणदिवे,चंद्रकांत भोसले,नितीन सोनवणे,निलेश खरात,सचिन काकडे,राहुल कांबळे,सुशिल भोसले,कैलास शिंदे,आकाश मेमाणे,नितीन गव्हाळे,प्रियानंद काकडे यांनी केले होते.
