जळोचीच्या ओढा अतिक्रमणामुळे नागरिकांचे हाल
बारामती : जळोची येथील गट नंबर 289 येथील नैसर्गिक ओढ्यात अतिक्रमण करून बेकायदेशीर प्लॉटिंग केल्यामुळे नैसर्गिक ओढ्याचा मुख्य प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे त्यामुळे नुकत्याच झालेल्या ( दि.3 सप्टेंबर ) रोजी झालेल्या पावसामुळे परिसरातील नागरिकांच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचे निदर्शनास आले. तर त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे यांनी याप्रकरणी प्रशासनाला वारंवार जळोची येथील नैसर्गिक ओढा बुजूवून बेकायदा प्लॉट पाडले असून बेकायदा अतिक्रमण केले असल्या बाबत तक्रारी दिल्या त्यांतर प्रशासनाच्या वतीने ओढ्याची प्रत्यक्ष स्थळ पाहणी देखील प्रशासनाकडून झाली आहे मात्र प्रशासकीय बाबूंच्या लाल फितीतल्या दप्तर दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीच कारवाई केली नाही हि शोकांतिकाच म्हणावी लागेल.
