धक्कादायक घटना : तरुणाने मैत्रिणीची हत्या करून, स्वतः केली आत्महत्या
पुणे : पुणे शहरातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. संगमवाडी परिसरात गणेश काळे (वय 28, रा. बीड) या तरुणाने स्वतःच्या मैत्रिणीची हत्या केली. त्यानंतर तळेगाव येथे जाऊन त्याने स्वत:चेही जीवन संपवले.
मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुण व तरुणी दोघेही पुण्यातील एका रुग्णालयात कामाला होते. त्यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून मैत्री होती. मात्र काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. या वादातूनच तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आरोपी गणेश काळे हा मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी असून तरुणी पुण्यातीलच होती. दोघेही एकाच रुग्णालयात नोकरी करत होते. काही कारणांमुळे निर्माण झालेल्या मतभेदातून ही दुर्दैवी घटना घडल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
