बारामतीत तलवार व कोयत्यासह तरुणाला केले जेरबंद ! पोलिसांची धडाकेबाज कारवाई, दहशतीचे बाळकडू रोखले

बारामती : बारामती एमआयडीसी परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे तलवार आणि लोखंडी कोयता बाळगणाऱ्या तरुणाला बारामती तालुका पोलिसांनी पकडून जेरबंद केले आहे. ही कारवाई पोलिसांनी वेळीच केली नसती, तर गंभीर प्रकार घडण्याची शक्यता होती, अशी चर्चा परिसरात रंगली आहे.
समर्थ सिद्ध मल्हारे (रा. मालुसरेवस्ती, वंजारवाडी, ता. बारामती) असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, समर्थ मल्हारे हा इसम तलवार घेऊन फिरत आहे. त्यानंतर पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे यांच्यासह पथकाने एमआयडीसी परिसरातील श्रायबर डायनामिक्स डेअरी शेजारी छापा टाकून मल्हारे यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने तलवार घरी ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता एक तलवार आणि एक लोखंडी कोयता मिळून आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे, अंमलदार केदारनाथ बिडवे, दादा दराडे, किशोर वीर, निलेश वाकळे, विलास खाडे, रवींद्र सोनवलकर व राहुल लांडगे यांच्या पथकाने केली. बारामती तालुका पोलिसांनी दाखवलेली दक्षता आणि जलद कारवाईमुळे परिसरात संभाव्य गुन्हा रोखण्यात यश आले आहे.