बारामतीत युवतीवर जबरदस्तीचा प्रयत्न; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

बारामती :बारामती शहरातील सुर्यनगरी येथे एका 27 वर्षीय युवतीवर जबरदस्तीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नरूटे (रा. काझड, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता आरोपी नरूटे हा घर बघण्याचा बहाणा करून दोन मित्रांसह आला. त्याने रूमचा व्हिडिओ काढून मित्रांना बाहेर काढले व दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर युवतीला फोनवर कोणाशीही संपर्क करू न देण्याच्या उद्देशाने तिचा मोबाईल हिसकावून घेतला. “कोणाला सांगितले तर जागीच जीवे मारीन” अशी धमकी देत तिला जबरदस्ती केली व तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, असे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
घटनेनंतर आरोपीने “मी तुला पैसे देतो, कुणाला सांगू नकोस” असे सांगून शिवीगाळ केली व घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.