घरात डोकावल्याचा सवाल जीवावर बेतला; दगड-दांडक्यांनी हल्ला

बारामती : चौधरवस्ती, वंजारवाडी (ता. बारामती) येथे घरात डोकावल्याच्या वादातून एकाला शिवीगाळ करून दगड व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात भवानीसिंग (मूळगाव – छपरा सारन, बिहार, सध्या रा. चौधरवस्ती, वंजारवाडी, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीनुसार, २२ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास ते त्यांच्या घराबाहेर उभे असताना सहाणी हा इसम त्यांच्या घराच्या दारात उभा राहून घरात डोकावत होता. “तु घरात का डोकावतोस?” असा जाब विचारल्याने वाद झाला.
या कारणावरून आरोपी सहाणी व लोखंडे (दोन्ही रा. चौधरवस्ती, वंजारवाडी) तसेच दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीस शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने तसेच दगडाने मारहाण करून दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद आहे.