ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने शैक्षणिक किटचे वाटप

बारामती : 1500 वा ईद-ए-मिलादुन्नबी बारामती शहरात सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. इफ्तेखार अन्सारभाई आतार मित्र परिवार व हंटर बॉईज ग्रुपतर्फे नेहमीप्रमाणे भिगवण चौकात मिरवणुकीचे स्वागत करून सहभागी मुलांना केक वाटप करण्यात आले.
यंदा डीजे व लेझर लाइटवरील अनावश्यक खर्च टाळून शहरातील सर्व उर्दु शाळांमध्ये (मक्तब) 1000 शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले.
या किटमध्ये रायटिंग पॅड, फुलसाईज वही, कम्पास, रंगीत स्केचपेन, रायटिंग पेन, इंग्रजी अंकलिपी पुस्तक आदी शालेय साहित्याचा समावेश होता. समाजातील शिक्षकांच्या शुभहस्ते शहरातील विविध ठिकाणी या किटचे वितरण झाले.
या उपक्रमात इफ्तेखार आतार, आसीम तांबोळी, अबूतल्हा बागवान, साबीर पठाण, शाहरुख शेख, अबुजर बागवान, वसीम बागवान, साद बागवान, हुजेफ झारी, हसन आत्तार, अदनान आत्तार, अदनान बागवान, जैद बागवान, असद सय्यद, इरफान पठाण, साहिल शेख, मोईन तांबोळी, साहिल सय्यद, अजीम शिकिलकर, शाहिद शिकिलकर, मुसेफ बागवान, ताहिर शेख, आवेज शेख यांसह अनेक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तींनी सहकार्य केले.