October 23, 2025

अंमली पदार्थांची तस्करी करणारा इसम पोलिसांच्या जाळ्यात

22_08_2023-rewa_ndps_action

बारामती  : इंदापूर तालुक्यातील मौजे निमसागर हद्दीतील जंगल परिसरात अंमली पदार्थांचा साठा करून विक्री करणाऱ्या एका इसमाला वालचंदनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २ किलो ६०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून जप्त मुद्देमालाची किंमत एक लाख २५ हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम वामन निगडे (रा. निर्वांगी, ता. इंदापूर) हा गांजाचा साठा करून त्याची बेकायदा विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कळम बाजूकडून निमसागरच्या दिशेने येणाऱ्या सुझुकी कंपनीच्या दुचाकीवर सापळा रचला. तपासणीदरम्यान इसमाने संशयास्पद हालचाली करत माहिती देण्यास टाळाटाळ केली. गाडीच्या हँडलला लटकवलेली गुलाबी पिशवी तपासली असता तिच्यामध्ये चिकटपट्टीने पॅक केलेली पिशवी सापडली. ती उघडून पाहिल्यावर त्यामध्ये गांजा असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी पोलिस हवालदार गुलाब भीमराव पाटील यांनी फिर्याद दिली असून, आरोपी शुभम वामन निगडे याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वालचंदनगर पोलीस करत आहेत.

You may have missed

error: Content is protected !!