October 24, 2025

लोकहित प्रतिष्ठानतर्फे ईद मिलादुन्नबीला कव्वालीचा सांस्कृतिक जल्लोष

IMG-20250911-WA0101

बारामती  : ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने लोकहित प्रतिष्ठान तर्फे बारामतीच्या भिगवन चौकात भव्य कव्वालीचे आयोजन करण्यात आले होते. मशहूर कव्वाल हाजी सुलतान नाझा यांच्या दमदार सादरीकरणाने बारामतीकर मंत्रमुग्ध झाले. शहरात अशा प्रकारचा कव्वाली कार्यक्रम प्रथमच आयोजित करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला.

या कार्यक्रमासाठी आकर्षक व नेत्रदीपक स्टेज सजविण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर व बारामती नगरीचे माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला नगरसेवक अभिजित काळे, माजी नगरसेवक सुरज सातव, माजी नगरसेवक जयसिंग देशमुख, माजी नगरसेवक अमजद बागवान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सोहेल शेख, तांबोळी जमात अध्यक्ष मुनीर तांबोळी, समाजसेवक सिद्धनाथ भोकरे, माजी शिक्षण मंडळ सदस्य अजीज शेख, समाजसेवक अझर शेख, योगेश महाडिक, गौरव अहिवळे, सय्यद भाऊसाहेब यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच पत्रकार सोमनाथ कवडे, संतोष जाधव, मोईन बागवान, सुरज देवकाते यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा व्यक्त केल्या.

या यशस्वी कार्यक्रमासाठी अस्लम तांबोळी, जावेद शेख, हाजी इम्रान शेख, शब्बीर पठाण, समद शेख, परवेज शेख, अमीर तांबोळी, वसीम शेख, जमीर इनामदार आदींसह लोकहित प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

बारामतीकरांनी प्रथमच ईद मिलादुन्नबी निमित्त असा भव्य कव्वाली सोहळा अनुभवला असल्याने परिसरात समाधान आणि उत्साहाचे वातावरण होते.

You may have missed

error: Content is protected !!