October 24, 2025

बारामती शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार

IMG_20250910_204818

बारामती :नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद झाल्यामुळे बारामती शहरातील नागरिकांना याचा फटका बसणार आहे. यामुळे शहरात नियमित पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. परिणामी शुक्रवार दि. १२ सप्टेंबरपासून बारामती नगरपालिकेच्या वतीने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नगरपालिकेकडून कळविण्यात आले आहे की, नीरा डावा कालव्याचे पाणीपुरवठा आवर्तन काही दिवस बंद असल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा कमी प्रमाणात होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपला पाण्याचा वापर काटकसरीने करावा. आवश्यक गरज भागवूनच पाणी वापरणे, पाणी साठवून ठेवणे तसेच अनावश्यक पाणी वापर टाळण्यावर भर द्यावा, असे आवाहन नगरपालिकेने केले आहे.

नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच या काळात पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही नगर पालिका प्रशासनाने केले आहे.

You may have missed

error: Content is protected !!