October 24, 2025

माळेगाव पोलिसांची कारवाई:तीन दिवसात चोरीची केली उकल, आरोपी गजाआड.

WhatsApp Image 2025-09-01 at 7.37.21 PM

बारामती : माळेगाव परिसरातील राजहंस चौकातील शनी मंदिरासमोरून चोरीला गेलेली सात लाख रुपये किमतीची मिनीबस माळेगाव पोलिसांनी केवळ तीन दिवसांत शोधून काढत आरोपीला गजाआड केले आहे. या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.

मिनीबस चोरीची घटना

२८ ऑगस्ट रोजी पहाटे एक ते पाच या वेळेत माळेगाव येथील राजहंस चौकातील शनी मंदिरासमोरील मोकळ्या जागेत उभी केलेली फोर्स कंपनीची टेम्पो ट्रॅव्हल्स मिनीबस अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. ही मिनीबस सचिन बाबासो कोकरे (रा. धुमाळवाडी, बारामती) यांच्या ताब्यात होती. त्यांनी तत्काळ माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

पोलिसांचा शिताफीने तपास

फिर्यादी मिळाल्यानंतर माळेगाव पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले. सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक बाबींचा अभ्यास करून पथकाने एका टेम्पो चालकावर संशय घेतला. चौकशीअंती प्रदीप रामचंद्र शिंदे (रा. करावाघच बारामती) याने मिनीबस चोरीची कबुली दिली.

आरोपीकडून मिनीबस जप्त

आरोपीकडून सात लाख रुपये किमतीची चोरीस गेलेली मिनीबस पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस हवालदार राहुल पांढरे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, पोलीस हवालदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे, आमदार अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, नितीन कांबळे, अमोल वाघमारे यांनी सहभाग घेतला.

You may have missed

error: Content is protected !!