बारामतीत हॉटेल मॅनेजरवर ३४ लाखांचा अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल

बारामती : बारामती शहर पोलीस ठाण्यात दत्तात्रय पोपटराव खुळे (रा. माळेगाव, ता. बारामती) यांच्या विरोधात तब्बल ३४ लाख ३३ हजार ३९३ रुपयांच्या अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अतुल उद्धव पवार यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१८ ते २४ जुलै २०२४ या कालावधीत गुनवडी गाव हद्दीतील हॉटेल सुरज मध्ये दत्तात्रय खुळे हे मॅनेजर म्हणून कार्यरत होते. हॉटेलचा संपूर्ण व्यवहार त्यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र, खुळे यांनी बनावट ग्राहकांची नावे दाखल करून, स्वतःच रजिस्टर तयार करत उधारी दाखवून हॉटेलच्या व्यवहारातील ३४ लाखांहून अधिक रकमेचा अपहार केला.
याबाबत पवार यांनी खुळे यांच्यावर विश्वासघात आणि फसवणुकीचा आरोप करत तक्रार नोंदविली असुन. या फिर्यादीवरून पोलीसांनी खुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.