October 24, 2025

शेकडो मुस्लिम तरुणांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

ab

बारामती: मुस्लिम समाजातील समस्या सोडवण्यात असताना तरुणांना रोजगार,कर्ज,व्यवसाय, नोकरी आदी साठी सहकार्य करू व मुस्लिम समाजाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पवार गटाचे पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पुणे जिल्हा फिरोज बागवान व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अल्पसंख्याक बारामती अध्यक्ष अस्लम तांबोळी, तसेच बारामती चिकन मालक संघटना असोसिएशनचे अध्यक्ष मोईन शेख, तसेच फुल अँड फायनल ग्रुपचे अध्यक्ष मोसिन पठाण आणि  फुल अँड फायनलचे दोनशे कार्यकर्त्यांनी प्रतिनिधिक स्वरूपात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला या वेळी अजित पवार बोलत होते.

याप्रसंगी मा.नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, शिक्षण मंडळाचे मा.सदस्य अजीज शेख ,बारामती बँक चेअरमन सचिन सातव आदी मान्यवर उपस्तीत होते.

फिरोज बागवान यांच्या मागणी वरून बारामती शहरातील मुस्लिम कब्रस्तान मधील माती बदलणे व इतर सार्वजनिक समस्या सोडवू तसेच बारामतीचा विकास होत असताना मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेऊ व विविध राजकीय पदावर कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले

बारामतीच्या विकासात मुस्लिम समाज्याचे देखील योगदान असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचार धारेनुसार कार्य करणार असल्या बाबतच्या  प्रतिक्रिया फिरोज बागवान आणि अस्लम तांबोळी यांनी दिली.

यावेळी  सर्व कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करून घेण्यासाठी विशेष परिश्रम करणारे मा शिक्षण मंडळ सदस्य अजीज शेख यांचा सत्कार अजित पवार यांनी केला.

You may have missed

error: Content is protected !!