रस्त्याच्या कामावरून ठेकेदाराला शेतकऱ्यांनी दिला चोप; दोघांविरोधात गुन्हा दाखल

बारामती : बारामती तालुक्यातील मौजे शिरसुफळ येथे बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या शिर्सुफळ–गोजुबावी रस्त्याच्या कामावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी या कामाला हरकत घेतली असून, याच दरम्यान ठेकेदाराला मारहाण व धमकावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ठेकेदार अनिकेत दत्तात्रय मुळीक यांच्या फिर्यादीवरून दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 25 ऑगस्ट रोजी दुपारी ठेकेदार अनिकेत मुळीक हे कामाच्या ठिकाणी गेले असता दोन व्यक्तींनी त्यांना “रोडचा कॉन्टॅक्टर कोण आहे?” असा सवाल केला. त्यानंतर वकील सारथी दिनेश पानसरे व मयूर विकास पानसरे ( दोघे रा. सिर्सुफळ ता. बारामती ) यांनी मुळीक यांना अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी “हे भाडखाऊ, तू आमच्या शेतात रस्ता करतोस? तुझ्यासकट मशीन जाळून टाकीन” अशी धमकी देत अश्लील शिवीगाळ करण्यात आली. तसेच “तुझी कागदपत्रे मला दाखवू नको” असे म्हणत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
होत असलेला रस्ता हा महत्वाचा मानला जातो, मात्र सरकारी यंत्रणा स्थानिकांना विचारात न घेता मनमानी करीत असल्याने त्याचे रुपांतर रोषात होत आहे, होत असलेला रास्तामुळे बांधकाम विभाग आणि शेतकरी यांचा संघर्ष सुरु झाला आहे. जरी रस्ता गावाच्या विकासाचा मार्ग असला तरी झाल्या प्रकारावरून शेतकऱ्यांसाठी प्रशासकीय बाबूंची मनमानी डोकेदुखी ठरत आहे असेच म्हणावे लागणार आहे.