चारित्र्यावर संशय घेत पतीने केला पत्नीचा खुन
बारामती : चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बारामतीतील बांदलवाडी येथे घडली. लहु रामा वाईकर (वय 48) या इसमाने धारदार शस्त्राने वार करत पत्नीचा खून केला.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी पती लाहु वाईकर ( वय ४८ वर्षे रा बंदलवाडी बारामती ) यांना आपल्या पत्नीच्या चारित्र्याबाबत संशय होता. या संशयातून त्याने पत्नीच्या डोक्यात, कपाळावर व चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करत तिला गंभीर जखमी केले.
घटनेनंतर गंभीर अवस्थेत जखमी महिलेला तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक राऊत पुढील तपास करत आहेत.
