October 24, 2025

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

fir

बारामती : ढेकळवाडी (ता. बारामती) येथे जागरण गोंधळ कार्यक्रमावरून वाद निर्माण होऊन पारधी समाजाच्या व्यक्तीस जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश धुळा भोसले (रा. ढेकळवाडी) यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सचीन दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर) व त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. ५ मे २०२५ रोजी मध्यरात्री आयोजित जागरण गोंधळ कार्यक्रमात फिर्यादी भोसले पत्नीसह उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर घरी जात असताना आरोपी सचीन दराडे व दोन अनोळखी इसमांनी पारधी समाजाचा असल्याचा उल्लेख करून जातीवाचक अपशब्द वापरत भोसले यांना शिवीगाळ केली. विरोध करताच भोसले यांना मारहाण करण्यात आली. त्यांना गटारीत ढकलून दगड मारण्यात आला. यात त्यांच्या कमरेला गंभीर दुखापत झाली असून, आरोपींनी त्यांना दगडाने ठेचून टाकण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड करीत आहेत.

You may have missed

error: Content is protected !!