May 30, 2025

पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची गळफास घेवुन आत्महत्या

sucide_1595577519_1727611718127

बारामती : पतीचे त्रयस्त महिलेशी प्रेम संबंध असल्याने पती स्वतःच्या पत्नीचा छळ करीत होता, पतीच्या वारंवार होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून पत्नीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बारामतीत घडली आहे.

सविस्तर हाकीकात अशी कि तालुक्यातील मासाळवाडी येथील मयत विवाहितेला पती शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता तसेच पतीचे विवाह बाह्य त्रयस्त महिलेशी प्रेम संबंध असल्याने मयत पत्नीला वारंवार शारिरीक मानसीक त्रास देऊन छळत होता, तसेच त्रयस्त महिलेशी लग्न केल्याचे सांगत होता त्या त्रासाला कंटाळून पत्नीने घराच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात पती शिवाजी माणिक देडे ( रा मासाळवाडी ता. बारामती) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड हे करीत आहेत.

error: Content is protected !!