May 28, 2025

महिलेसह दोन चिमुकल्यांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळले, तिहेरी हत्याकांडाची शक्यता ?  

crime-1-5

बारामती : रांजणगाव गणपती येथे दोन लहान मुले तसेच महिलेचा अर्धवट जळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे या धक्कादायक घटनेने शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. महिलेसह दोन चिमुकल्याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने, तिहेरी हत्याकांडाची शक्यता ? व्यक्त केली जात आहे

रांजणगाव गणपती येथील खंडाल माथ्याजवळ पुणे अहिल्यानगर महामार्ग जवळ ग्रोवेल कंपनीच्या मागच्या बाजूला अर्धवट जळालेले हे तीन मृतदेह रविवारी निदर्शनास आले झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सदरील तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून महिलेचे वय 25 ते 30 वर्ष मुलाचे साडेतीन ते चार वर्ष आणि मुलीचे एक ते दीड वर्ष वय आहे. शवविच्छेदनानंतर मृत्युचे नेमके कारण समोर येईलच मात्र सध्या मृतांची ओळख पटलेली नाही.

 घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी घटनास्थळी भेट दिली रांजणगाव एमआयडीसी पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना पोलीस अधीक्षक यांनी अधिकच्या तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

error: Content is protected !!